चक्रीवादळ धडकले, या राज्यांत मुसळधार तर महाराष्ट्रात कुठे पाऊस – मच्छिंद्र बांगर अंदाज
चक्रीवादळ धडकले, या राज्यांत मुसळधार तर महाराष्ट्रात कुठे पाऊस – मच्छिंद्र बांगर अंदाज
Read More
Namo Shetkari yojan ; पुढचा हप्ता कधी? राज्यातील एवढे शेतकरी पात्र.
Namo Shetkari yojan ; पुढचा हप्ता कधी? राज्यातील एवढे शेतकरी पात्र.
Read More
वाहनधारकांनो सावधान\! ‘एचएसआरपी’ (HSRP) लावण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक
वाहनधारकांनो सावधान\! ‘एचएसआरपी’ (HSRP) लावण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More

कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.

कोनत्याही महीला अपात्र नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका.

५२ लाख महिला अपात्र नसल्याचे स्पष्टीकरण.

राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून ५२ लाख महिलांना अपात्र केले असल्याची माहिती प्रसार माध्यमांद्वारे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. या सर्व बातम्या निराधार असल्याचे राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. काही प्रसार माध्यमांवर ‘प्राथमिक छाननीत ५२ लाख लाभार्थी महिला अपात्र’ अशा मथळ्याखाली आलेल्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नाहीत आणि त्या निराधार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी आवश्यक.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. केवायसी केल्यानंतर महिलांना अपात्र केले जाणार असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहेत. यावर स्पष्टीकरण देताना आदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी e-Kyc प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ही प्रक्रिया कोणत्याही लाभार्थ्याला जाणूनबुजून बाद करण्यासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.

मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिला भगिनींना आवाहन केले आहे की, योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमांतून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता, केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. याचबरोबर, त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे की, e-Kyc ची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सर्व पात्र महिला भगिनींनी या मुदतीत आपली e-Kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.

Leave a Comment