चक्रीवादळ धडकले, या राज्यांत मुसळधार तर महाराष्ट्रात कुठे पाऊस – मच्छिंद्र बांगर अंदाज
चक्रीवादळ धडकले, या राज्यांत मुसळधार तर महाराष्ट्रात कुठे पाऊस – मच्छिंद्र बांगर अंदाज
Read More
Namo Shetkari yojan ; पुढचा हप्ता कधी? राज्यातील एवढे शेतकरी पात्र.
Namo Shetkari yojan ; पुढचा हप्ता कधी? राज्यातील एवढे शेतकरी पात्र.
Read More
वाहनधारकांनो सावधान\! ‘एचएसआरपी’ (HSRP) लावण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक
वाहनधारकांनो सावधान\! ‘एचएसआरपी’ (HSRP) लावण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक
Read More
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करा घरबसल्या
Read More
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
सेनयार’ के बाद, बंगाल की खाड़ी में नए तूफान की आहट
Read More

चक्रीवादळाची तीव्रता वाढली, महाराष्ट्रावर काय होनार परिणाम – मच्छिंद्र बांगर अंदाज

मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज ; सध्या ‘दितवाह’ (DITWAH) चक्रीवादळाची तीव्रता वाढलेली असून याचा परिणाम प्रामुख्याने तामिळनाडू आणि रायलसीमा या राज्यांवर दिसून येत आहे. हे चक्रीवादळ श्रीलंकेवरून भारताच्या दिशेने सरकत आहे आणि याचा प्रभाव साधारणपणे चेन्नई, विजयवाडा आणि विशाखापट्टणम पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या नवीन चक्रीवादळ प्रणालीमुळे देशात काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे, परिणामी थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.

दक्षिण आणि मध्य भारतातील हवामानाची स्थिती

चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळे भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तर आंध्र प्रदेश आणि रायलसीमा मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, केरळ आणि दक्षिण कर्नाटकामध्ये येलो अलर्ट कायम आहे.

वादळाचा प्रभाव कमी झाल्यावरही आंध्रप्रदेश, रायलसीमा आणि तामिळनाडूच्या तुरळक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम राहील. एकूणच, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र राज्यावर कोणताही विशेष हवामानातील बदल किंवा पावसाचा धोका नाही.

महाराष्ट्रातील थंडीचा अंदाज

राज्यातील बहुतांश भागांमध्ये थंडी जाणवत आहे. अहमदनगर, बीड, पुणे, पूर्व सातारा आणि पूर्व भागांमध्ये थंडीच्या प्रमाणात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भाकडून थंडीचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. कोकणात थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे.

सध्या तयार झालेल्या प्रणालींमुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विशेष थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवणार नाही, अशी शक्यता आहे. उत्तर भारतात एक हलका ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ (WD) येऊन जाईल, परंतु त्याचा फारसा परिणाम होणार नाही आणि सौम्य स्वरूपाची थंडी जाणवण्याची शक्यता आहे.

Leave a Comment